कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना झाला आहे. ताप व अंगदुखी असल्याने काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याना पुणे येथील घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. ...
राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला ज ...
सीसीटीएनस (क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली पोलीस दलाने अव्वल क्रमांक मिळविला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती. ...
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते. ...
सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या. ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ठाणे, धुळे, वर्धा, मुंबई महानगरपालिका, पीएम केअर, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू, टाटा ट्रस्ट आदि विविध ठिकाणी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. ...