शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 16:27 IST

पलूस येथील कृष्णाई नवरात्र महोत्सवात साहस

पलूस : माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम व स्वप्नाली विश्वजित कदम यांनी पलूस येथे आयोजित  केलेल्या कृष्णाई नवरात्र महोत्सवात पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन यांनी  नऊवारी साडी आणि मराठमोळा साज करत  पॅरामोटरच्या साहाय्याने चार  हजार फुटांवरून पॅराजम्पिंग केले. नारिशक्तीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने शीतल महाजन हिने हे  साहस केले.

यावेळी पॅरामोटरचे पायलट असलेल्या चंद्रकांत महाडिक  यांच्या पॅरामोटारमधून शीतल महाजन या आकाशात चार हजार फुटांवर उंच गेल्या. त्या ठिकाणी पॅरामोटारमधून शीतल यांनी आकाशात झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच तीन हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांची गर्दीत असलेल्या मैदानावरच्या रिकाम्या जागेत त्यांनी  यशस्वी लँडिंग केले.

यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात शीतल महाजन यांचे स्वागत केले. शितल महाजन या भारती विद्यापीठाच्या पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या  माजी विद्यार्थीनी आहेत. मागील आठवड्यात  डॉ.पतंगराव कदम यांच्या "लोकतीर्थ" या स्मारकाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या आग्रहास्तव  कृष्णाई नवरात्र  महोत्सव कार्यक्रमात पलूस येथे  पॅराजम्पिंग  करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे शीतल महाजन यांनी नऊवारीत पॅरामोटारमधून पॅराजम्प करून  दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.यापूर्वी २०२२ मध्ये पुणे येथे ५ हजार फूट उंचीवरून त्यांनी नऊवारीत यशस्वी   स्काय डायव्हिंग केले आहे. 

आज पलूस ४ हजार फुटावरून उडी घेतल्यानंतर शितल महाजन यांनी सुरक्षित लँडिंग केल्यावर  आमदार डॉ.विश्वजित कदम, स्वप्नाली  कदम, विजयमाला कदम, खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड व शांताराम कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी "माझं गाव पलूस कडेगाव" लिहलेला बॅनर शितल महाजन यांनी झळकविला.

ही  उडी नारीशक्तीसाठी : शितल महाजन 

"पॅरामोटर मधून पराशूटच्या सहाय्याने उडी घेऊन  महिलांच्या प्रचंड गर्दीत असलेल्या रिकाम्या जागेत यशस्वीपणे खाली उतरणे महत्वाचे होते.अशा प्रकारे गर्दीत उतरण्याचे साहस मी पहिल्यांदाच केले. यामुळे ही कामगिरी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण ही उडी "नारीशक्ती'साठ प्रेरणादायी ठरेल असे यावेळी शितल महाजन म्हणाल्या. 

टॅग्स :Sangliसांगली