प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पडळकर यांची नौटंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:00+5:302021-02-05T07:31:00+5:30
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर अनुकंपातून तयार झालेले नेते, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला ...

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पडळकर यांची नौटंकी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर अनुकंपातून तयार झालेले नेते, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पाटील म्हणाले, लोकशाहीशिवाय आणि लोकांनी स्वीकारल्याशिवाय राजकारण करता येत नाही. जनतेच्या जिवावरच राजकारणात सत्ता मिळू शकते आणि जयंत पाटील यांनी राजकारणास सुरुवात केल्यापासून आजअखेर जनतेच्या पाठिंब्यावरच अनेक पदे मिळवली आहेत. लाेकांनी लाखोंच्या मताधिक्याने निवडून देऊनच जयंत पाटील यांना राजकीय उंचीवर नेऊन ठेवले आहे. याची जाण आमदार गोपीचंद पडळकर यांना नाही. अनुकंपाचा विषय नोकरीसाठी असतो. इतके साधे ज्ञान जर पडळकरांना नसेल तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवे. केवळ राजकीय लोकप्रियता मिळवण्यासाठी मोठ्या नेत्यांवर आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे उद्योग पडळकर यांच्याकडून सुरू आहेत, असेही पाटील म्हणाले.