इस्लामपुरात २५० कुटुंबांना जेवणाची पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:55+5:302021-05-13T04:26:55+5:30
इस्लामपुरातील महादेवनगर, बेघर अमार्टमेंट, डवरी गल्ली येथे जेवणाची पाकिटे वाटण्यात आली. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वनश्री नानासाहेब ...

इस्लामपुरात २५० कुटुंबांना जेवणाची पाकिटे
इस्लामपुरातील महादेवनगर, बेघर अमार्टमेंट, डवरी गल्ली येथे जेवणाची पाकिटे वाटण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या द्वितीय पुण्यसमरणानिमित्त लॉकडाऊन व कोरोना काळात सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून ज्यांची रोजंदारी अडचणीत आली आहे, अशा महादेवनगर येथील बेघर अपार्टमेंट, डवरी गल्ली, सांगलकर चाळ, दिनकर पाटील चाळमधील जवळपास २५० कुटुंबांपर्यंत एकवेळ जेवणाची पाकिटे घरपोच देण्यात आली.
यावेळी वीरेंद्र राजमाने, धीरज कबुरे, महादेव करे, सतीश पवार, मयूर शेजाळे, अखिलेश शिंदे, संपतराव पाटील, अमोल मदने, बाबासाहेब पाटील, सौ. कमल आडके, रमाकांत शिंदे, संग्राम चव्हाण, अनिल राठोड तसेच युवकमित्र यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व कार्यकर्ते व मान्यवरांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजन महाडिक युवशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात व महादेवनगर मित्र परिवार, इस्लामपूर यांनी केले..