कर्नाटकातून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:20+5:302021-04-27T04:28:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याला कर्नाटकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून ऑक्सिजन टँकर उपलब्ध झाला ...

कर्नाटकातून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टँकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याला कर्नाटकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून ऑक्सिजन टँकर उपलब्ध झाला आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने गंभीर होणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज असते; मात्र सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन उपलब्ध करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील जेएसडब्ल्यू कंपनीशी संपर्क साधून सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन टँकर दिला. इथून पुढे हा ऑक्सिजन टँकरचा पुरवठा असाच सुरू ठेवण्याबद्दलही जेएसडब्ल्यू कंपनीकडून ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला असल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.