शेटफळे मिनी कोविड सेंटरला ऑक्सिजन यंत्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:12+5:302021-05-28T04:20:12+5:30
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) गावचे सुपुत्र व गलाई व्यावसायिक प्रवीण पोपट गायकवाड यांनी शेटफळे येथील मिनी कोविड केअर ...

शेटफळे मिनी कोविड सेंटरला ऑक्सिजन यंत्र भेट
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) गावचे सुपुत्र व गलाई व्यावसायिक प्रवीण पोपट गायकवाड यांनी शेटफळे येथील मिनी कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन यंत्र भेट दिले.
आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा देशमुख, आरोग्यसेवक नाना चवरे, आरोग्यसेविका पवार, सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, विजय देवकर, सोमनाथ गायकवाड यांच्या प्रयत्नातून गावातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. गृह अलगीकरण पूर्णपणे बंद करून शेटफळेतील पंडित जवाहरलाल नेहरु हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा येथे संस्थात्मक विलगीकरणात रुग्णांना ठेवल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली ते बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व इतर लोकांची लगेच कोरोना चाचणी घेत, त्यांना विलगीकरणात ठेवल्याने संसर्ग होण्यापासून गाव सुरक्षित राहिले आहे.
गावातील प्रवीण गायकवाड हे गलाई व्यवसायानिमित्ताने बेंगलोरला आहेत. त्यांनी ऑक्सिजन मशीन मिनी कोविड केअर सेंटरला भेट दिले आहे.
फोटो ओळ : शेटफळेत मिनी कोविड केअर सेंटरला प्रवीण गायकवाड यांनी ऑक्सिजन मशीन भेट दिले. यावेळी जीवनकुमार आवताडे, डॉ. सुरेखा देशमुख, आरोग्यसेवक नानासाहेब चवरे, विजय देवकर उपस्थित होते.