सलगरेतील कोविड सेंटरला काँग्रेसतर्फे ऑक्सिजन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:59+5:302021-05-22T04:24:59+5:30
मिरज - मिरज पूर्व भागातील सलगरे येथील मदनभाऊ पाटील कोविड हॉस्पिटलमध्ये मिरजेचे विधानसभेचे काँग्रेसचे नेते प्रा. सिद्धार्थ जाधव ...

सलगरेतील कोविड सेंटरला काँग्रेसतर्फे ऑक्सिजन मशीन
मिरज - मिरज पूर्व भागातील सलगरे येथील मदनभाऊ पाटील कोविड हॉस्पिटलमध्ये मिरजेचे विधानसभेचे काँग्रेसचे नेते प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी ऑक्सिजन मशीन दिले. मिरज पूर्व भागात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांना या ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीनचा उपयोग होणार आहे.
अमेरिकन कंपनीचे हे मशीन वाहून नेता येत असल्याने वाहनात, वाडी वस्तीवर, घरात या मशीनद्वारे रुग्णांना ऑक्सिजन देता येतो. मुंबई महापालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांच्या सहकार्याने गुंडेवाडी, मालगाव व मिरज पूर्व भागात कोविड रुग्णांसाठी आणखी ऑक्सिजन मशीन देणार असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती उपसभापती अनिल आमटवणे, सदस्य अशोक मोहिते, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, बलराज जाधव, सचिन निंबाळकर, सुनील अभंगराव, डॉ. सगरे उपस्थित होते.