सांगली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता माडग्याळमध्ये ३० ऑक्सिजन बेडची सोय करण्यात येणार आहे. विटा, चिकुर्डे, वांगी व ढालगावमध्ये २० ऑक्सिजन बेड सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.
आरोग्य समितीच्या ऑनलाईन सभेत सभापती आशा पाटील यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बुधवारअखेर एकूण ५ लाख ७२ हजार ३२४ नागरिकांचे लसीकरण झाले असून ते ७१ टक्के इतके आहे. १४ हजार ७४६ रुग्ण उपचाराखाली आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मार्चपर्यत ५६ हजार ६५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. २४ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपये वितरित करण्यात आले. चर्चेत निजाम मुलाणी, सरिता कोरबू, तम्मनगौडा रवी पाटील, रेश्मा साळुंखे, वैशाली कदम, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, क्षयरोग अधिकारी डॉ. एस. ए. जोशी, हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव, आदींनी भाग घेतला.