नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरला ऑक्सिजनची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:29+5:302021-05-30T04:22:29+5:30

कुपवाड : कोरोनासारख्या गंभीर आजारामध्ये रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारे शहरातील उद्योजक चंद्रकांत सरगर यांनी ...

Oxygen assistance to the Kovid Center of the Namarah Foundation | नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरला ऑक्सिजनची मदत

नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरला ऑक्सिजनची मदत

कुपवाड : कोरोनासारख्या गंभीर आजारामध्ये रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारे शहरातील उद्योजक चंद्रकांत सरगर यांनी सांगलीतील नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरमधील वीस लोकांसाठी एका दिवसाला लागणाऱ्या ऑक्सिजनची सोय केली आहे. त्यांच्या या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे फाउंडेशनच्या कार्याला चांगलाच हातभार लागला आहे.

डीटीडीसी कंपनीचे संचालक चंद्रकांत सरगर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्येही त्यांनी कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी सांगलीतील नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरमधील वीस रुग्णांसाठी एका दिवसाला लागणाऱ्या ऑक्सिजनची सोय केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे नमराह फाउंडेशनसारख्या नि:स्वार्थी व सर्वधर्मसमभाव भावनेने एक चांगले कार्य करणाऱ्या फाउंडेशनच्या कार्याला चांगला हातभार लागला आहे.

यावेळी डीटीडीसीचे चंद्रकांत सरगर, नमराह फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद नायकवडी, नगरसेवक संतोष पाटील, अल्ताफ पेंढारी, मुन्नाभाई पट्टेकरी, रहीम मुल्ला, आबासाहेब सरगर आदी उपस्थित होते.

फोटो २९कुपवाड : ओळ - सांगलीतील नमराह फाउंडेशनमधील कोविड रुग्णांच्या ऑक्सिजनच्या सोयीसाठी उद्योजक चंद्रकांत सरगर यांनी मदतीचा धनादेश दिला. यावेळी जावेद नायकवडी, संतोष पाटील, अल्ताफ पेंढारी, आबासाहेब सरगर उपस्थित होते.

Web Title: Oxygen assistance to the Kovid Center of the Namarah Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.