शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क/शरद जाधव सांगली : उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओकडून मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याच्या परवान्याचे आता नूतनीकरण करणेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क/शरद जाधव

सांगली : उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओकडून मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याच्या परवान्याचे आता नूतनीकरण करणेही शक्य होणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी नूतनीकरणाचा पर्याय उपलब्ध नव्हता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय दुतावासात जाऊन याबाबतची प्रक्रिया परवानाधारकांना करता येणार आहे.

परदेशात नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे आवश्यक असते. त्याशिवाय त्या देशात वाहन चालविण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच मात्र, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी परदेशात असलेले अनेकजण परवाना काढून त्याचा परदेशात वापर करतात. हा परवाना काढताना पुन्हा चाचणी देण्याची आवश्यकता लागत नाही मात्र, सध्याचा वाहन परवाना, व्हीसासह पासपोर्टची पडताळणी करून स्थानिक अधिकारी त्यास परवानगी देतात. ही सोय आता ऑनलाईन करत अवघ्या एका दिवसात परवाना प्रक्रिया पूर्ण होत असून, याची मुदत संपल्यास आता भारतीय दुतावासातून अर्ज केल्यास त्याचे नूतनीकरणही करता येणार आहे.

चौकट

असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

१) वाहन परवाना काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे.

२) हा परवाना आवश्यक असलेल्यांना ‘सारथी’वरुन ऑनलाईन प्रक्रिया करता येणार आहे. सध्याचा परवाना, व्हीसा जोडून ही प्रक्रिया होते.

३) प्रक्रिया ऑनलाईन असली, तरी कागदपत्रांची पडताळणी करूनच वाहन परवाना दिला जातो.

४) एक हजार रुपये शुल्कासह आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

चौकट

कोण काढतो हा वाहन परवाना

* जिल्ह्यातील अनेक गलाई बांधव व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांचे यास प्राधान्य आहे.

* आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरीसाठी जाताना परवाना घेऊन जातात. यात अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांची संख्या जास्त आहे.

* केवळ नोकरी, व्यवसायच नव्हे, तर शिक्षणासाठीही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा तरुणांसाठीही वाहन परवाना आवश्यक असतो. ते आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतात.

कोट

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळविण्यासाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करून तो दिला जातो. नूतनीकरणाबाबत शासन निर्देशांचे पालन करण्यात येते.

- विलास कांबळे, आरटीओ, सांगली

चौकट

कोरोनाकाळात संख्या घटली

२०१८ ४०

२०१९ ८८

२०२० २७

२०२१ १९