शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पूरग्रस्त छोटे व्यावसायिकच्या मदतीसाठी 63 कोटीहून अधिक रक्कम बँकेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:38 IST

छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त छोटे व्यावसायिकच्या मदततहसिल कार्यालयाकडून 63 कोटीहून अधिक रक्कम बँकेत जमा

सांगली : छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे.

यापैकी 15 हजार 786 लाभार्थ्यांच्या खात्यावर 61 कोटी 44 लाख 72 हजार 242 रूपये इतकी रक्कम 11 नोव्हेंबर अखेर बँकेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.पूरबाधित 88 हजार 600 कुटूंबापैकी 85 हजार 808 कुटूंबाना 42 कोटी 90 लाख 40 हजार रूपये अनुदान रोखीने देण्यात आले आहे. तर बँक खात्यावर मिरज तालुक्यातील 54 हजार 719 बाधित कुटूंबांपैकी 50 हजार 513 कुटूंबांना 43 कोटी 55 लाख 70 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

पलूस 8 कोटी 95 लाख 20 हजार, शिराळा तालुक्यात 3 कोटी 6 लाख 5 हजार, वाळवा तालुक्यात 5 कोटी 90 लाख 95 हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.तात्पुरत्या निवाऱ्यासाठी घरभाडेपोटी ग्रामीण भागातील 8425 कुटूंबापैकी 2249 कुटुंबाना 5 कोटी 39 लाख 76 हजार रूपये व शहरी भागातील 388 कुटुंबापैकी 243 कुटूंबांना 87 लाख 48 हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.पूरबाधित कुटूंबांना निर्वाह भत्ता प्रति प्रौढ व्यक्तीस 60 रूपये व प्रति बालकास 45 रूपये या प्रमाणे मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील एकूण 88 हजार 600 बाधित कुटुंबातील 1 लाख 71 हजार 171 प्रौढ व्यक्ती व 45 हजार 334 बालकांना एकूण 11 कोटी 60 लाख 12 हजार 340 रूपये निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला आहे.माहे ऑगस्ट मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 81 हजार 513 कुटुंबांना 8151.3 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे. माहे सप्टेंबर मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 52 हजार 811 कुटुंबांना 5281.1 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे. माहे ऑक्टोंबर मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 52 हजार 814 कुटुंबांना 5281.4 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे.बारा बलुतेदार/छोटे व्यवसायिक/दुकानदार/टपरीधारक यांना मानकानुसार 1158 लाभार्थ्यांची रु 92 लाख 86 हजार 650 इतकी रक्कम खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. हस्तकला/बाराबलुतेदार 1174 लाभार्थ्यांचे 3 कोटी 63 लाख 67 हजार 978 इतके अनुदान खातेवर जमा करण्यात आले आहे. अशीही माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली