शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

World Tuberculosis Day: सांगली जिल्ह्यात दरवर्षी आढळतात २ हजारांवर क्षयरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:39 IST

क्षयरोगाचा क्षय करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत

सांगली : जिल्ह्यात दरवर्षी २ हजारांहून अधिक क्षयरुग्ण आढळत असून, क्षयरोग अद्याप सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या ठरत आहे. मात्र, वेळेवर निदान, नियमित उपचार आणि जनजागृती वाढविल्यास क्षयरोगाचा पूर्णतः क्षय करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात कुपोषण, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि जागरूकतेचा अभाव यामुळे क्षयरोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. शहरी भागातही गर्दी, प्रदूषण आणि अस्वच्छता ही कारणे रोगाचा प्रसार वाढवितात.कोविडनंतरच्या काळात नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण दुर्दैवाने काही अंशी वाढताना दिसत आहे. २०२४ मध्ये जगभरात एक कोटीहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले. त्या एका वर्षात जगभरात १२ लाखाहून अधिक रुग्ण क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडले. यातील गंभीर करणारी बाब म्हणजे जगातील क्षयरुग्णांपैकी २५ टक्के क्षयरुग्ण भारतात आहेत.

दरवर्षी २४ मार्चला दिन२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. २४ मार्च १८८२ या दिवशी ‘रॉबर्ट कॉक’ नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने क्षयरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ या जंतूचा शोध लावला.

कशामुळे होतो क्षयरोगफुफ्फुसाचा क्षयरोग हा क्षयरुग्णाच्या थुंकीतून सर्वत्र पसरु शकतो. क्षयरोग ज्या व्यक्तीला झालेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या थुंकीत क्षयजंतू आहेत, त्या व्यक्तीने संपूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. कुठेही थुंकणे, खोकणे , शिंकणे , मोठ्याने बोलणे या सर्व क्रियांतून तुषारांवाटे हे जंतू हवेत पसरतात. मधुमेह, कर्करोग, एचआयव्ही बाधित व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

ही आहेत लक्षणेसंध्याकाळी बारीक ताप येणे, रात्री दरदरून घाम येणे, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, खोकला येणे, खोकल्यातून कफ / बेडके किंवा रक्त पडणे, दम लागणे ही क्षयरोगाची लक्षणे औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसांत कमी होतात.

मध्येच उपचार बंद करणे धोक्याचेक्षयरोग संपूर्ण बरा होण्यासाठी किमान सहा महिने, न चुकता सलगपणे उपचार घ्यावा लागतो. पण लक्षणे कमी होताच, अनेकजण औषधोपचार मध्येच बंद करतात. अशा मध्येच उपचार बंद करण्यामुळे, औषधाला दाद न देणारा अतिचिवट एम.डी.आर. आणि एक्स.डी.आर. प्रकारचा क्षयरोग- टी.बी. निर्माण होऊ शकतो, असे छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिक मडके यांनी सांगितले.

एकदा का निदान झाले की तातडीने औषधोपचार सुरू करणे आवश्यक असते. औषधोपचाराबरोबरच सकस आहार-विशेषकरून प्रथिनेयुक्त आहाराची नितांत आवश्यकता असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास यावर मात शक्य आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. - डॉ. अनिल मडके, छातीरोग विशेषज्ञ, सांगली

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Faces High TB Cases: Prevention is Key, Experts Say

Web Summary : Sangli district reports over 2,000 TB cases annually. Early diagnosis, treatment, and awareness are crucial. Malnutrition and lack of hygiene contribute. Experts emphasize complete treatment to avoid drug-resistant TB. A protein-rich diet is also important for recovery.