शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून १० हजारांवर तर वारणेतून साडेचार हजार क्युसेक विसर्ग; कृष्णा, वारणा नद्यांची पातळी स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:34 IST

धरण भरण्यास केवळ ४ टक्केच साठ्याची गरज

सांगली : पाऊस बंद झाला असला तरी अलमट्टी धरणात १००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ९५.५७ टक्के धरण भरले आहे. म्हणून कोयना धरणातून रविवारी सकाळपासून १० हजार ४०० क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. तसेच वारणा धरणातही ३२.४९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ९४ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे धरणातून चार हजार ७३६ क्युसेक विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग चालू असला तरी कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे.मागील आठवड्यात धरण क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. धरणे तुडुंब भरली असून, ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. कृष्णा, वारणा नद्यांनाही पूर आला होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे महापुरापासून बचाव झाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसीची असून, सध्या १००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरणात ९५.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या १२ हजार ४३९ क्युसेकने पाण्याची आवक असून, एवढ्यावर धरण १०० टक्के भरू शकते. म्हणूनच सध्या धरणातून रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून १० हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग सुरू असला तरी कृष्णा नदीला पूर येणार नाही. नदीची पाणीपातळी २० फुटाला स्थिर राहू शकते.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजलेपासून विसर्ग चालू केला आहे. वक्र द्वाराद्वारे तीन हजार १०६ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे व विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग कायम ठेवून एकूण चार हजार ७३६ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे.चौकट

अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेकने विसर्गअलमट्टी धरणामध्ये सध्या १०३.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये दोन लाख ७३ हजार ३४० क्युसेकने आवक चालू आहे. म्हणूनच धरणातून एक लाख ७५ हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळीठिकाण - पाणीपातळी फुटात

  • कृष्णा पूल कराड - ९.८
  • बहे पूल - ६.६
  • ताकारी पूल - १६.१०
  • भिलवडी पूल - २०
  • आयर्विन पूल - २२.९
  • राजापूर बंधारा - ४६.६

धरणातून विसर्गधरण - पाणीसाठा / टक्केवारी / विसर्ग क्युसेक

  • कोयना - १००.६० / ९६ / १०४००
  • वारणा - ३२.१९ / ९४ / ४७३६
  • अलमट्टी - १०४ / ८५ / १७५०००
  • धोम - १३.२३ / ९८ / १४२८
  • कण्हेर - ९.८५ / ९८ / १८९६