शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:27 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागांवर डाऊनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरढोण, कुकटोळी परिसरात यामुळे द्राक्षबागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देद्राक्षबागांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भावशेतकरी धास्तावले, बागायतदार हवालदिल

महेश देसाई शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागांवर डाऊनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरढोण, कुकटोळी परिसरात यामुळे द्राक्षबागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यात डाऊनीचा सर्वाधिक फटका आगाप द्राक्षबागायत क्षेत्राला बसला आहे. फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांच्या घडामध्ये पावसाचे पाणी साचल्याने व ढगाळ वातावरणामुळे बागेतील घड कुजत आहेत. दुसऱ्या डिपिंगच्या अवस्थेत असलेल्या बागेतील पानावर व घडावर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहाटेच्यावेळी दव पडल्याने या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.बाजारात डाऊनीस रोखण्यासाठी मिळणारी औषधे कुचकामी ठरत आहेत. एक हजारापासून ते सहा ते सात हजार रुपयांपर्यंत किलो किंवा लिटरमध्ये मिळणाऱ्या औषधांच्या दिवसातून दोनवेळा फवारणी करावी लागते. तरीही डाऊनी आटोक्यात येत नाही. यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहे.औषधे, खते आणि मजुरांवर केलेला खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे. या भीतीने शेतकरी हादरले आहेत.बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे अत्यंत सुमार दर्जाची औषधे बाजारात आली आहेत. त्यासाठी हजारो रुपये खर्च करूनसुद्धा डाऊनी आटोक्यात येत नाही.

प्रशासनाने ना पंचनामा केला ना कोणतीही आकडेवारी घेतली. लोकप्रतिनिधींनाही नुकसानीची पाहणी करायलाही वेळ नाही. तरी प्रशासनाने या नुकसानीचे किमान पंचनामे तरी करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली