गवळेवाडी परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:09+5:302021-07-08T04:18:09+5:30
कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळा) परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. संबंधित विभागाने ...

गवळेवाडी परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळा) परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
शिराळा पश्चिम भागात एक महिन्यांपूर्वी खरीप हंगामातील मका पिकाची धूळ वाफ पद्धतीने पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पडलेल्या पावसाने मका पिकांची चांगली उगवण झाली आहे. मात्र पिकावर लष्करी अळी पडली आहे. ही अळी पूर्ण पाने कुरतडत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याबाबत गवळेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी, प्रचिती दूध संघाचे संचालक सुरेश चिंचोलकर यांनी तालुका कृषी अधिकारी गणपत पाटील यांच्याशी संपर्क करून या पिकावर कोणते औषध कसे फवारावयाचे आणि पिकांची कशी काळजी घ्यावी, याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले आहे.