शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा पात्राबाहेर, वारणेला पुन्हा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:39 IST

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे.

ठळक मुद्देकृष्णा पात्राबाहेर, वारणेला पुन्हा पूरशिराळा तालुक्यात ५१.७ मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. कोयना व वारणा धरण क्षेत्रात रविवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. सोमवारी सकाळी पुन्हा जोर वाढल्याने विसर्ग कायम राहिला आहे. कोयनेतून ५६ हजार ४३१ तर वारणा धरणातून १४ हजार ४८६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊ लागली आहे.

सांगलीत कृष्णेची पातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.६ फूट इतकी झाली होती. सांगली, पलूस तालुक्यात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप-अमणापूर पुल पाण्याखाली गेला आहे.

वारणा नदी यापूर्वीच पात्राबाहेर पडली असून शिराळा तालुक्यातील एकूण ७ पुल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार एकूण सरासरी १६.६७ मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात ५१.७ मि.मी. इतका झाला आहे. वारणा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत १२३ मि.मी. पाऊस नोंदला गेला.

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ५१.७ मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १६.६७  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५१.७  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस 

मिरज १३.८ (३९२.२), तासगाव ११.३ (३५४.३), कवठेमहांकाळ ८.८ (४०३.९), वाळवा-इस्लामपूर २५.१ (४५४.३), शिराळा ५१.७ (१०३३.१), कडेगाव ११.२ (३६४.७), पलूस १२.८ (३१६.२), खानापूर-विटा ७.८ (४६३.८), आटपाडी ०, (२८६), जत ७.५ (२३१.९).

टॅग्स :RainपाऊसfloodपूरSangliसांगलीKoyana Damकोयना धरण