दहा आगारातील १५११ पैकी ६२ चालकांकडूनच अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:47+5:302021-02-05T07:31:47+5:30
सांगली विभागामध्ये सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा, आदी दहा आगारातून जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा दिली ...

दहा आगारातील १५११ पैकी ६२ चालकांकडूनच अपघात
सांगली विभागामध्ये सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा, आदी दहा आगारातून जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा दिली जात आहे. या आगारामध्ये एकूण एक हजार ५११ चालक कार्यरत आहेत. त्यापैकी जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ६२ चालकांकडूनच अपघात झाले आहेत. चोवीस अपघात हे अत्यंत किरकोळ असून २६ अपघात गंभीर आहेत. बारा अपघातांमध्ये समोरच्या व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहेत. बारा महिन्यांपैकी एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत एसटीचा एकही अपघात झाला नाही. अपघात टाळण्यासाठी चालकांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी अधिकारी वर्गही सातत्याने प्रबोधन करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चौकट
मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात
महिना अपघात संख्या
जानेवारी ११
फेब्रुवारी २३
मार्च ६
मे ३
जून १
ऑक्टोबर ५
नोव्हेंबर ७
डिसेंबर ६
एकूण ६२
चौकट
जिल्ह्यातील एसटी चालकांची एकूण संख्या : १५११
दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा : ३८
पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २२
चौकट
विनाअपघात सत्कार पात्र
-३० वर्षे विनाअपघात सेवा : ४
-२५ वर्षे विनाअपघात सेवा : ३१
-२० वर्षे विनाअपघात सेवा : २३
- १५ वर्षे विनाअपघात सेवा : २२
-१० वर्षे विनाअपघात सेवा : ३८-
-५ वर्षे विनाअपघात सेवा : २
एकूण : १२०
कोट
एसटी चालकांच्या चुकीमुळे अत्यंत कमी अपघात झाले आहेत. चालक नेहमी विनाअपघात प्रवाशांना सेवा देऊन महामंडळाकडून होणाऱ्या सत्कारासाठी पात्र होण्यासाठी धडपडत असतो. शंभर टक्के एसटीचा प्रवास सुरक्षित आणि खात्रीशीरच असतो, पण काहीवेळा समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे किरकोळ अपघाताला एसटीच्या चालकास सामोरे जावे लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
-आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, सांगली.
चौकट
स्पीड लॉक, तरीही कालबाह्य बसेसमुळे अपघात
लांब पल्ल्याच्या बसेस ताशी ७० किलो मीटरला आणि ग्रामीण बसेस ताशी ६० किलो मीटरला स्पीड लॉक आहेत. तरीही २०२० या वर्षात ६२ अपघात झाले आहेत. याबाबत एसटी प्रशासनाशी चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले की, काहीवेळा अचानक दुसरे वाहन बसला धडकते. अनेक कालबाह्य बसेस, बसचा ब्रेक फेल आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे स्पीड लॉक असतानाही अपघात होत आहेत.
कोट
फोटो : ३०रमेश जाधव
कौटुंबिक अडचणी आणि कार्यालयातील समस्या तिथेच ठेवून शांतपणे प्रवाशांची सेवा केली. मी स्वत: वारकरी असल्यामुळे प्रवासी आणि अन्य वाहन चालकांशीही माझे कधी भांडण झाले नाही. कोणतेही व्यसन नसल्यामुळेच तीस वर्षे विनाअपघात प्रवाशांची सेवा करता आली.
-रमेश जाधव, चालक, तासगाव आगार.