अन्यथा कळंबा टोलनाका उद्ध्वस्त : ‘एन. डी.’
By Admin | Updated: October 26, 2014 00:35 IST2014-10-26T00:35:37+5:302014-10-26T00:35:37+5:30
कृती समितीचा बैठकीत इशारा : ग्रामपंचायतीची परवानगी उद्यापर्यंत घ्या; तणावाचे वातावरण

अन्यथा कळंबा टोलनाका उद्ध्वस्त : ‘एन. डी.’
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे शेतातील वस्तीवर राहिलेल्या शेतमजुराच्या झोपडीत दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त ताटात ठेवलेल्या १५ हजार ६०० रुपयांच्या रोख रकमेसह अडीच तोळे सोन्याचे दागिने असा ७५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात दोघा चोरट्यांनी पळवला. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास घडली. घरातील लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
याप्रकरणी जोतिराम बाळाप्पा मिसाळ (वय २५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मिसाळ कुटुंबासह जुनेखेड-वाळवा रस्त्यावरील पाखले मळ्याजवळील देशमुख वस्तीवरील छप्परवजा घरात कुटुंबासह राहतात. त्यांचा पॉवर ट्रिलरचाही व्यवसाय आहे. २३ तारखेला त्यांच्या झोपडीसमोरच्या पडवीत त्यांच्या कुटुंबाने लक्ष्मीपूजन केले. यावेळी त्यांनी पूजनासाठी १५ हजार ६०० रुपयांची रोकड तसेच पत्नी, मुलगी यांच्याकडील सोन्याच्या रिंगा, अंगठी, मणी मंगळसूत्र, सोन्याचे मणी असे अडीच तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. पूजन केलेल्या पडवीला प्लॅस्टिकच्या कापडाची कमान व दरवाजा आहे. त्या रात्री मिसाळ कुटुंबीय जेवण करून झोपी गेले.
मध्यरात्री एकच्या सुमारास मिसाळ हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना दोघेजण झुडपातून पळून जात असलेले दिसले. त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर घरातील इतर लोकही उठले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी पडवीतील कपाटात बघितल्यावर सर्व दागिने व रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)