मिरजेत श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST2021-02-16T04:27:56+5:302021-02-16T04:27:56+5:30

सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अनिलभाऊ कुलकर्णी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंच, समर्थ मंडळ पोलीस भरती व ...

Organizing Shri Samarth Vidya Saraswati Trophy Kabaddi Competition in Miraj | मिरजेत श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मिरजेत श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अनिलभाऊ कुलकर्णी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंच, समर्थ मंडळ पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, संत सेवा संघ व सव्यासाचि गुरुकुलम् वेंगुरूळ या संस्थांतर्फे ५५ किलो वजनी पुरुष गटातील निमंत्रित श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते व विशाल पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी नितीन मदने, विशाल माने, रिशांक देवाडिगा, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंसह सिनेअभिनेत्री ऋजुता देशमुख उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते रविवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे.

मिरज शहर व परिसरातील खेळाडूंच्या कबड्डी कौशल्याला वाव देण्यासाठी व मर्दानी खेळांच्या पुनरुज्जीवनासाठी संस्था कार्यरत असून, क्रीडाप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मिरज विद्या समितीचे अध्यक्ष व अनिलभाऊ कुलकर्णी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: Organizing Shri Samarth Vidya Saraswati Trophy Kabaddi Competition in Miraj