ऑनलाइन गायन, नृत्य स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:20+5:302021-08-14T04:31:20+5:30

सांगली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकमत बालविकास मंचतर्फे ऑनलाइन गायन आणि सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिथे मुलांनी ...

Organizing online singing and dancing competitions | ऑनलाइन गायन, नृत्य स्पर्धेचे आयोजन

ऑनलाइन गायन, नृत्य स्पर्धेचे आयोजन

सांगली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकमत बालविकास मंचतर्फे ऑनलाइन गायन आणि सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिथे मुलांनी घरातच एक देशभक्तीपर गीतगायन किंवा सोलो डान्स करून त्याचा व्हिडिओ आमच्या लोकमत इव्हेंट्स कोल्हापूर सांगली सातारा या फेसबुक पेजवर अपलोड करायचा आहे . दिनांक १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५पर्यंत स्पर्धेसाठी गायनाचा किंवा नृत्याचा व्हिडिओ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोस्ट व लाइक्स मिळवता येतील. ही स्पर्धा ५ वर्षे ते १० वर्षे आणि ११ वर्षे ते १६ वर्षे या दोन वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

नियम व अटी :

व्हिडिओ जास्तीत जास्त दोन मिनिटांचा असावा. व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओसोबत तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, शाळेचे नाव, मोबाइल नंबर पोस्ट करणे अनिवार्य आहे. (माहिती पूर्ण नसल्यास प्रवेश ग्राह्य पकडला जाणार नाही.)

एक स्पर्धक एका स्पर्धेत एकच व्हिडिओ पाठवू शकतो. दोन्ही स्पर्धेचे व्हिडिओ वेगवेगळे पोस्ट करावेत.

१२ ऑगस्ट २०२१ रोजीपासून १७ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत स्पर्धेसाठी पोस्ट केलेले व्हिडिओ स्वीकारले जातील.

पोस्टला मिळालेल्या लाइक्स आणि परीक्षकांच्या परिक्षणानुसार विजेते निवडले जातील. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्पर्धेचा निकाल खाली दिलेल्या https://www.facebook.com/lokmatevent या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात येईल

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

या ऑनलाइन स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना प्रवेश घेता येईल. अधिक माहिती साठी संपर्क : कोल्हापूर : ९७६७२६४८८५, सांगली : ९१६८३६८२७७, कराड : ८७९६२४११११, सातारा : ९९६००३००६९

चाैकट

गिफ्ट पार्टनर

सक्सेस अबॅकस

६५पेक्षा जास्त शाखा असलेली महाराष्ट्र व गोवामधील अबॅकस कंपनी आहे. सक्सेस अबॅकस मुलांना कॅल्क्युलेटरसारखे गतीने गणिते सोडविणे, मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.

Web Title: Organizing online singing and dancing competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.