इस्लामपुरात आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: November 12, 2014 23:21 IST2014-11-12T22:24:58+5:302014-11-12T23:21:13+5:30
बाल विकास मंचचा उपक्रम : शनिवारी स्पर्धा

इस्लामपुरात आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
इस्लामपूर : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून बालविकास मंचच्या सदस्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी वीर पुरुष आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सॉफ्टेक कॉम्प्युटर्स यांच्या सहकार्याने ई-आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांसाठी होणार असून, या स्पर्धेसाठी ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन चरित्र’ हा विषय ठेवण्यात आला आहे. बालमंच सदस्यांना मोफत प्रवेश असणार आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता मारुती मंदिराजवळील सॉफ्टेक कॉम्प्युटर्स येथे ही स्पर्धा होईल.
यापूर्वी ‘महात्मा गांधींचे जीवनचरित्र’ या विषयावर स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षीस वितरण केले जाणार आहे. बालदिनाचा सोहळा केक कापून साजरा करण्यात येणार आहे. तरी बालमंच सदस्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंच संयोजिकांनी केले आहे. (वार्ताहर)
शनिवार, दि. १५ रोजी आयोजित वीरपुरूष आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन चरित्र’ हा विषय ठेवण्यात आला आहे. बालमंच सदस्यांना मोफत प्रवेश असणार आहे. यापूर्वी ‘महात्मा गांधींचे जीवनचरित्र’ या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे.