राज्यात ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:37+5:302020-12-09T04:22:37+5:30

सांगली : राज्यात १२ आणि १३ डिसेंबररोजी ऑनलाईन रोजगार महामेळावा आयोजित केला आहे. याद्वारे विविध खासगी कंपन्यांत सुमारे ६५ ...

Organizing online employment fair in the state | राज्यात ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

राज्यात ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

सांगली : राज्यात १२ आणि १३ डिसेंबररोजी ऑनलाईन रोजगार महामेळावा आयोजित केला आहे. याद्वारे विविध खासगी कंपन्यांत सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर मेळावा होईल. नववीपासून आयटीआय, डिप्लोमा, बी.ई, आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रताधारक तरुणांना नोकरीची संधी मिळेल.१३ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवायचा आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्‌योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी ही माहिती दिली.

मेळाव्यामध्ये युरेका फोर्ब्स, सहयाद्री मोटर्स, भारती मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, रोटाडाईन प्रायव्हेट लि., एलआयसी, फोर्स मोटर्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, रुप पॉलिमर्स, मिंडा कॉर्पोरेशन, प्रीमिअर सील्स, महिंद्रा स्टील सर्व्हिस सेंटर, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह, मरेली मदरसन ऑटो आदी कंपन्यांनी विविध रिक्त पदे नोंदविली आहेत. मुलाखतीसाठी ठिकाण, दिनांक व वेळ सोयीनुसार कळविली जाणार आहे.

--------------

Web Title: Organizing online employment fair in the state