प्लेगमधील शाहू महाराजांच्या कार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:32+5:302021-06-04T04:20:32+5:30

सांगली : ‘प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य’ या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रविवारी ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सव्वाशे ...

Organizing lectures on the work of Shahu Maharaj in the Plague | प्लेगमधील शाहू महाराजांच्या कार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन

प्लेगमधील शाहू महाराजांच्या कार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन

सांगली : ‘प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य’ या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रविवारी ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहूंनी प्लेगच्या साथीमध्ये शास्त्रीय पद्धतीने प्रचंड कार्य केले. धार्मिक उपायांच्या मागे न लागता शास्त्रीय पद्धतीने साथीशी लढा दिला. संस्थानातील प्रजेचे रक्षण केले. साथीच्या काळात गावोगावच्या जत्रा, यात्रा बंद केल्या. सध्याच्या कोरोना साथीमध्ये हे कार्य राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे. ते आजच्या पिढीला समजावे, म्हणून रविवारी (दि. ६) संध्याकाळी ५ वाजता शाहू चरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. विलासराव पोवार (कोल्हापूर) यांचे ऑनलाईन व्याख्यान झूमवर आयोजित केले आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या शाहू महाराजांवरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी चोरमारे यांच्याहस्ते होईल.

Web Title: Organizing lectures on the work of Shahu Maharaj in the Plague