ब्रह्मनाळमध्येे शनिवारी, रविवारी ‘आनंदोत्सव २०२१’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST2021-02-16T04:27:50+5:302021-02-16T04:27:50+5:30

सांगली : ब्रह्मनाळ (ता.पलूस) येथे कृष्णा-वेरळा नद्यांच्या संगमावरील आनंदमूर्ती घाटावर शनिवारी व रविवारी (दि. २०, २१) ‘आनंदोत्सव-२०२१’ साजरा ...

Organizing 'Anandotsav 2021' on Saturday and Sunday in Brahmanal | ब्रह्मनाळमध्येे शनिवारी, रविवारी ‘आनंदोत्सव २०२१’चे आयोजन

ब्रह्मनाळमध्येे शनिवारी, रविवारी ‘आनंदोत्सव २०२१’चे आयोजन

सांगली : ब्रह्मनाळ (ता.पलूस) येथे कृष्णा-वेरळा नद्यांच्या संगमावरील आनंदमूर्ती घाटावर शनिवारी व रविवारी (दि. २०, २१) ‘आनंदोत्सव-२०२१’ साजरा होत आहे. आनंदमूर्ती स्वामी संस्थानने आयोजन केले असून पश्चिम महाराष्ट्रातील निवडक चित्रकारांची निसर्गचित्र कार्यशाळा होणार आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे ३० चित्रकार सहभागी होतील. ब्रह्मनाळ गाव, घाट परिसर, संगम आणि सभोवतालचा निसर्गरम्य कृष्णाकाठ उतरवतील. या निवासी कार्यशाळेतील सर्वच कलावंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक प्राप्त चित्रकार आहेत. चित्रकला, शिल्पकला आणि काव्य या ललित कलांचा उत्सवात समावेश आहे. शनिवारी सकाळी उद्‌घाटनानंतर दिवसभर निसर्गचित्रे रेखाटन होईल. संध्याकाळी भूपाळी ते भैरवी हा लोककलेचा आविष्कार होईल. रविवारी दुपारपर्यंत निसर्गचित्र रेखाटन होईल. त्यानंतर त्याचे प्रदर्शन सुरू होईल. कोल्हापुरातील ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे यांचे व्यक्तिशिल्प साकारतील. त्याचवेळी आभाळमाया फौंडेशनतर्फे निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे. संध्याकाळी चित्रकारांचा सत्कार व सांगता समारंभ होईल.

कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. आनंदोत्सवाचे संयोजन विलास गोसावी, प्रा. सुरेश पंडित, प्रा. बाळासाहेब पाटील, स्मिता कुलकर्णी यांच्यासह संस्थानने केले आहे.

Web Title: Organizing 'Anandotsav 2021' on Saturday and Sunday in Brahmanal