ऑक्सिजन पुरवठा कोरोना रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:05+5:302021-04-09T04:28:05+5:30

सांगली : कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता जिल्ह्यात येणारा संपूर्ण ऑक्सिजन रुग्णालयांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. उद्योगांचा पुरवठा पूर्णत: ...

Order to reserve oxygen supply to Corona Hospitals | ऑक्सिजन पुरवठा कोरोना रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश

ऑक्सिजन पुरवठा कोरोना रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश

सांगली : कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता जिल्ह्यात येणारा संपूर्ण ऑक्सिजन रुग्णालयांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. उद्योगांचा पुरवठा पूर्णत: बंद केला असून, त्यामुळे उद्योजकांची कसरत सुरू झाली आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनचे दोघे पुरवठादार आहेत. जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयांसाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. पण मार्चमध्ये सुरुवातीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागताच शंभर टक्के ऑक्सिजन कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या मिरज कोविड रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन टॅंकद्वारे पुरवठा होतो. उर्वरित सर्व रुग्णालयांना सिलिंडरमधून दिला जातो. ही सिलिंडर्स दोघा पुरवठादाराकडून भरून दिली जातात.

जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादनाचा एकही प्रकल्प नाही. कोल्हापुरात आहेत; पण तेथून सांगलीला येत नाही. त्यामुळे सांगलीला पुण्यावर अवलंबून रहावे लागते. एकट्या मार्चमध्ये ३४२० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर ताण पडत आहे. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा उच्चांक होण्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे, त्याला तोंड देण्याची तयारीही ठेवली आहे.

चौकट

ऑक्सिजनअभावी उद्योजकांची घुसमट

ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने उद्योजकांची घुसमट होऊ लागली आहे. फाउन्ड्री, फॅब्रिकेटर्स यांची कामे ऑक्सिजनअभावी थांबली आहेत. निर्यातीच्या प्रकल्पांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.

चौकट

सांगलीचा ऑक्सिजन विदर्भात वळवला

पुण्यातून सांगलीसाठी ऑक्सिजन पुरवठा होतो. विदर्भ-मराठवाड्यात कोरोनाची दुसरी लाट उसळताच सांगलीचा ऑक्सिजन पुरवठा तिकडे वळविण्यात आला. त्यावेळी सांगलीत नवी रुग्णसंख्या अत्यल्प होती. सध्या सांगलीत रुग्ण वाढू लागले तरी पुरवठा पूर्ववत झालेला नाही. विदर्भाचा पुरवठा कायम आहे.

Web Title: Order to reserve oxygen supply to Corona Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.