सिद्धेवाडीतील रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:02+5:302021-09-17T04:32:02+5:30
सिद्धेवाडी येथे गौण खणिज वाहतुकीने गावातील व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ताकामांसाठी दादा धडस यांनी रस्ता रोको ...

सिद्धेवाडीतील रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव देण्याचे आदेश
सिद्धेवाडी येथे गौण खणिज वाहतुकीने गावातील व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ताकामांसाठी दादा धडस यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्तादुरुतीसाठी यापूर्वी सरपंच रामचंद्र वाघमोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे. या भागातील पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी या कामासाठी पाठपुरावा सुरू केला. सिद्धेवाडी परिसरातील गौण खनिजच्या माध्यमातून कोट्यवधीचा शासनास महसूल मिळाल्याने सिद्धेवाडीतील दोन प्रमुख व गावातंर्गत रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी खाण कर्म विभागाचे अधिकारी देवेकर यांची भेट घेतली. देवेकर यांनी एक कोटीचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन देताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे, अशोक मोहीते, कृष्णदेव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सिद्धेवाडी व भोसे ही दोन्ही गावे आपल्या मतदार संघातील आहेत. रस्ताकामासाठी सिद्धेवाडीबरोबर भोसे गावासही एक कोटीच्या निधी तरतुदीचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी सांगितले.