एरंडोली अपहारप्रकरणी गुन्हे दाखलचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:27+5:302021-06-10T04:19:27+5:30

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची रक्कम परस्पर वापरल्याप्रकरणी दोन लिपिकांसह ...

Order to file charges in Erandoli embezzlement case | एरंडोली अपहारप्रकरणी गुन्हे दाखलचे आदेश

एरंडोली अपहारप्रकरणी गुन्हे दाखलचे आदेश

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची रक्कम परस्पर वापरल्याप्रकरणी दोन लिपिकांसह पाणी पुरवठा विभागाचा कर्मचारी व शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

एरंडोली ग्रामपंचायतीमध्ये सन २०१८-१९ व २०२०-२१ या कालावधीत घरपटी, पाणीपट्टीची वसुली करण्यात आली आहे. यात बोगस पावत्यांच्या आधारे गोलमाल होत असल्याचा संशय आल्याने उपसरपंच महेश मोरे यांच्यासह दहा सदस्यांनी तक्रार केली होती. डुडी यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर, विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम व संतोष इंगळे यांच्या समितीने चौकशी केली असता, यामध्ये कर वसुलीत सुमारे २ लाख ७३ हजारांचा अपहार झाल्याचे उघड झाले.

याबाबतचा चौकशी अहवाल डुडी यांच्याकडे कार्यवाहीसाठी सादर केल्यानंतर त्यांनी लिपिक दीपक खांडेकर, भारती सूर्यवंशी, पाणी पुरवठा कर्मचारी अभिजीत धेंडे, शिपाई गोपाळ वाघमारे यांना जबाबदार धरून चौघांविरोधात ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी

या अपहाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस. बी. विटेकर यांचीही खातेनिहाय चौकशी करून प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश गटविकास अधिकारी सरगर यांना डुडी यांनी दिला आहे.

Web Title: Order to file charges in Erandoli embezzlement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.