बोरगावमधील पोस्ट कर्मचाऱ्यांच्या चाैकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:14+5:302021-05-18T04:28:14+5:30
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील पोस्टात नियम धाब्यावर ठेवून घरपोच सेवा बंद करणाऱ्या पोस्टमास्तर, पोस्टमन व कर्मचाऱ्यांची चौकशी ...

बोरगावमधील पोस्ट कर्मचाऱ्यांच्या चाैकशीचे आदेश
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील पोस्टात नियम धाब्यावर ठेवून घरपोच सेवा बंद करणाऱ्या पोस्टमास्तर, पोस्टमन व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सांगली जिल्हा प्रवर्तक अधीक्षक एस. आर. खोराटे यांनी दिले आहेत.
पोस्टमास्तर व पोस्टमन गावात कोरोनाचे कारण देत नागरिकांना पोस्टात बोलावत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहेत.
पोस्टमास्तर आर. एन. गायकवाड व पोस्टमन कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश पोस्ट निरीक्षक मिलिंद किस्ते यांना देण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून त्यासंदर्भात अहवाल सादर केला जाणार आहे. शासकीय कर्मचारी जर नियमांचे पालन करत नसतील तर सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा करणे किती योग्य असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बेफिकीर कर्मचाऱ्यांवर कारवाई होत असल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात येत आहे.