सुरेंद्र शिराळकर आष्टा: आष्टा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीच्या माजी आमदार स्व विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील गट निवडणुकीला एकत्रितरित्या सामोरा जात असताना भाजप, शिवसेना, मनसे, रयत क्रांती व मित्र पक्ष तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट वेगवेगळे लढत आहेत. विरोधकांचे बेरजेच्या ऐवजी वजाबाकीचे राजकारण सुरु आहे.२०१६ च्या निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीला विरोधकांच्या लोकशाही आघाडीने जोरदार टक्कर दिली होती. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत विरोधी लता पडळकर यांचा निसटच्या मताने पराभव झाला होता. २१ जागापैकी आष्टा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह १५ तर विरोधी लोकशाही आघाडीने ३ व अपक्ष ३ ठिकाणी विजयी झाले होते.शिंदे-पाटील गटाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली होती. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे युतीतील घटक पक्ष वेगळी वाटचाल करीत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात येथील प्रवीण माने पक्षीय भूमिकेची आदेशानुसार अंमलबजावणी करीत आहेत.विरोधकांची एकी होणार?राज्यात सत्ता असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाने तसेच भाजप ,शिवसेना, मनसे, काँग्रेस व मित्र पक्षांनी विविध आंदोलने व विकास कामांच्या माध्यमातून जनतेची कामे केली आहेत काही आंदोलनासाठी ते एकत्र आले तरी प्रत्येकाने आपले वेगळे अस्तित्व जपले आहे त्यामुळे विरोधकांची एकी होणार का याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Summary : In Ashta, the ruling alliance faces fragmented opposition in the upcoming Nagar Parishad elections. BJP, Shiv Sena, and NCP factions are contesting separately, hindering a unified front against the ruling coalition led by the Shinde-Patil groups. Discussions revolve around the possibility of opposition unity.
Web Summary : आष्टा में, आगामी नगर परिषद चुनावों में सत्तारूढ़ गठबंधन का सामना खंडित विपक्ष से है। भाजपा, शिवसेना और एनसीपी गुट अलग-अलग चुनाव लड़ रहे हैं, जिससे शिंदे-पाटिल समूहों के नेतृत्व वाले सत्तारूढ़ गठबंधन के खिलाफ एक एकीकृत मोर्चा बाधित हो रहा है। विपक्ष की एकता की संभावना पर चर्चा चल रही है।