विरोधकांना हद्दपार करण्याचा डाव

By Admin | Updated: September 13, 2015 22:35 IST2015-09-13T22:24:57+5:302015-09-13T22:35:09+5:30

इस्लामपुरातील राजकारण : विरोधकांचे दर्शन झाले दुर्मिळ; अनेकजण नामधारी विरोधक

Opposition's expulsion | विरोधकांना हद्दपार करण्याचा डाव

विरोधकांना हद्दपार करण्याचा डाव

अशोक पाटील - इस्लामपूर --इस्लामपूर पालिकेतील सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा डाव पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे आणि खंडेराव जाधव यांनी आखला होता, परंतु तो फसला. तसेच विरोधी गटातील नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल हे पालिका कार्यक्षेत्रात भेटणे दुर्मिळ झाले आहेत. काही वेळा सत्ताधाऱ्यांतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे हे सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवितात.शहरात होत असलेल्या निकृष्ट विकास कामांवर थेट जाऊन ही कामे बंद पाडण्यासाठी माजी नगरसेवक वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार आक्रमक झाले आहेत. त्यांची ही भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी बनली आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनातील बेकायदेशीर कामकाजावर आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी आघाडी घेतली आहे. कुंभार यांना सत्ताधाऱ्यांतीलच काही नगरसेवक मार्गदर्शन करीत असल्याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून विजय पाटील, डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी सभागृहात काही गोष्टींवर आक्षेप घेऊन, विजय कुंभार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा राजकीय डाव आखला असल्याची चर्चा आहे.पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात विजय कुंभार हे एकाकी लढताना दिसतात. त्यांना ताकद देण्यासाठी विरोधी नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल सभागृहात उपस्थित नसतात. याचाच फायदा सत्ताधारी नगरसेवक उठवत आहेत. आनंदराव पवार यांच्यावर जिल्हा पातळीवरील शिवसेनेची जबाबदारी आहे. त्यामुळे ते प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध नसतात. तसेच दुसरे विरोधी नगरसेवक कपिल ओसवाल हे पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्रांच्या ताकदीवर बिल्डर व्यवसायात जम बसवत राजकारणाला फाटा देत असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत शहरातील सत्ताधाऱ्यांची ताकद वाढत असून विरोधी नगरसेवक आणि भाजपचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यामध्ये पायपोस राहिलेला नाही. त्यामुळेच पालिका सभागृहातून विरोधी पक्षालाच हद्दपार करण्याचे धोरण राष्ट्रवादीने आखले असल्याचे बोलले जात आहे.

बाबासाहेब सूर्यवंशी यांच्याबद्दल तर्क-वितर्क
पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच ३ गट आहेत. पालिका प्रशासनात काम करताना या तीनही गटांचे नेते दिवसा एकत्र येण्याचे नाट्य करतात, तर रात्री एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे डाव आखतात. त्यामुळे या तिन्ही गटनेत्यांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्यांतून शंका उपस्थित होत आहे.
एकेकाळी सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरणाऱ्या बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या तलवारीची धार आता बोथट झाली आहे. महिलांसाठी निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थेचीही वाट लागली आहे. सध्या ते अज्ञातवासात असल्याने त्यांच्याबद्दल अनेक तर्क—वितर्क लढविले जात आहेत.

Web Title: Opposition's expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.