छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध, सांगलीत इम्तियाज जलिलांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

By शीतल पाटील | Published: March 10, 2023 05:29 PM2023-03-10T17:29:52+5:302023-03-10T17:30:50+5:30

खासदार जलील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा

Opposition to the name of Chhatrapati Sambhajinagar, Add to the image of Imtiaz Jalil in Sangli and kill the movement | छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध, सांगलीत इम्तियाज जलिलांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध, सांगलीत इम्तियाज जलिलांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

googlenewsNext

सांगली : छत्रपती संभाजीनगर जिल्हा या नावाला विरोध करणाऱ्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेस सखल हिंदू समाजाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जलील यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन झाले. यावेळी जलील यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. शिंदे म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजी नगर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा असे नामांतरण केले आहे.

याविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आंदोलन करत आहे. त्यांनी कॅण्डल मोर्चाही काढला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. हजारो हिंदूंची मंदिरे उध्वस्त केली. त्याच्या नावाचा उदोउदो केला जात आहे. खासदार जलील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली.

यावेळी प्रसाद रिसवडे, गजानन हुलवाने, श्रीकांत शिंदे, उदय मुळे, रवि वादवणे, अजयकुमार वाले, अभिमन्यू भोसले, विकास आवळे, प्रकाश निकम, संजय निकम, अतुल शिंदे, प्रदीप निकम, आशिष साळुंखे, संजय जाधव, बाळासाहेब मोहिते, रामभाऊ सूर्यवंशी, अशोक पाटील, बाळासाहेब बेलवलकर, सुहास जोशी, प्रथमेश शेटे, दत्ता सूर्यवंशी, पंकज कुबडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Opposition to the name of Chhatrapati Sambhajinagar, Add to the image of Imtiaz Jalil in Sangli and kill the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.