मिरज रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी घरे हटविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:48+5:302021-02-20T05:15:48+5:30

मिरजेत रेल्वेच्या स्थानकालगत झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे ...

Opposition to removal of slum houses in Miraj railway boundary | मिरज रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी घरे हटविण्यास विरोध

मिरज रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी घरे हटविण्यास विरोध

मिरजेत रेल्वेच्या स्थानकालगत झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोमवारी झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकालगत व सांगली रस्त्यावर कुष्ठरोगी वसाहतीत याबाबत नोटिसा लावण्यात आल्या आहेत. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय् रेल्वे अभियंत्यांची भेट घेऊन कुष्ठरोगी बांधवांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार रेल्वे अधिकाऱ्यांनी दि. ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली असून, या कुष्ठरोगी बांधवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी शाम कांबळे, दीपक सातपुते, जॉन सत्याचारी, प्रमोद कोरे, डेनिअल कांबळे, गंगूबाई कसबे, अनिता गोरावे उपस्थित होते.

Web Title: Opposition to removal of slum houses in Miraj railway boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.