शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आठ तासांच्या शाळेला विरोध

By admin | Updated: December 3, 2015 23:54 IST

विनायक शिंदे : प्रशासनाविरोधात आंदोलन छेडणार

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या आठ तासांच्या शाळेला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने विरोध करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. प्रशासनाच्या धोरणास विरोध असल्याचे निवेदन शिक्षण समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांना दिले आहे. निर्णयामध्ये बदल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.ते म्हणाले की, आरटीईनुसार पहिली ते पाचवीचे वार्षिक कामांचे दिवस दोनशे व वार्षिक तास आठशे, तर सहावी ते आठवीच्या कामाचे दिवस दोनशे वीस व वार्षिक एक हजार तास असावेत, असे आदेश असताना आपल्या कामाचे सरासरी दिवस दोनशे चाळीस होतात व वार्षिक तास सरासरी तेराशे ते चौदाशे होतात. सहा तासांची शाळा असताना चौदाशे तास होत असतील, तर आठ तासाची शाळा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करणे गरजेचे होते. मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षकांना वेठीस धरणे धन्यता वाटते. आठ तासाच्या शाळेचा मसुदा राज्य शासनाने रद्द केला असूनही जि. प. हा ठराव का करत आहे, असा सवाल शिक्षक संघ करत आहे. या निर्णयाविरुध्द आंदोलनाचा इशाराही शिक्षक संघटनेकडून देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक संघाने गेल्या सहा महिन्यांपासून वेतनश्रेणीसाठी पाठपुरावा केला आहे, पण त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीच्या एनओसी देणे चालू आहे, पण सांगली जिल्हा परिषदेतच अडवणूक करित आहे. या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा विनायक शिंदे यांनी दिला आहे. यावेळी शिक्षक संघाचे हंबीरराव पवार, सतीश पाटील, शशिकांत माणगावे, अविनाश गुरव, प्रभाकर भोसले, अशोक पाटील, मुश्ताक पटेल, असीम मुल्ला, संघटनेचे तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षक संघाच्या मागण्याशिक्षकांच्या फरक बिलासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निधी उपलब्ध करावाशेजारच्या जिल्ह्यांना दिवाळी अग्रीम मिळाले, सांगलीतील शिक्षकांना मिळाली नाही. प्रशासनाकडून त्वरित मिळावी.महापालिका व नगरपालिका समायोजनेने आलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठता मिळालेली नाही. त्यांना त्वरित सेवा ज्येष्ठता मिळावी.वर्षापासून वरिष्ठ वेतनश्रेणीची यादी प्रलंबित आहे. जूनपासून शिक्षकांचे पगार नियमित होत नाहीत, त्यामध्ये सुधारणा व्हावी.