शिक्षक बँकेवर निराशेपोटी विरोधकांकडून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST2021-07-14T04:30:59+5:302021-07-14T04:30:59+5:30
सांगली : शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुरोगामी सेवा मंडळ व शिक्षक समितीने सर्वच संचालकांना संधी देत सन्मान केला. पण विरोधकांना ...

शिक्षक बँकेवर निराशेपोटी विरोधकांकडून टीका
सांगली : शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुरोगामी सेवा मंडळ व शिक्षक समितीने सर्वच संचालकांना संधी देत सन्मान केला. पण विरोधकांना हा सन्मान रुचलेला नाही. त्यांनीही संचालक फोडाफोडीचे अयशस्वी प्रयत्न केले. त्यात अपयश आल्यानेच निराशेपोटी बँकेवर टीका केली जात असल्याचा आरोप अध्यक्ष उत्तम जाधव यांनी केला.
जाधव म्हणाले की, शिक्षक बँकेत विरोधकांना कधीच संधी मिळणार नाही. सत्ताधारी संचालकांच्या दारात विरोधक गेले होते. आदल्या दिवसापर्यंत केविलवाणी धडपड कशासाठी सुरू होती, याचे उत्तर त्यांनी द्यावे. विरोधकांच्या एकही निष्ठावान संचालक नाही. त्यांनी संघटनावाढीसाठी आयुष्यभर कष्ट केलेल्या नेत्यावर टीका करणे चुकीचे आहे. वैफल्यग्रस्त होऊन नैराश्येपोटी शिक्षक बँकेवर टीका करत सुरू आहे.
बँकेकडून जामीनकीच्या कर्जावर ११ टक्के तर कोविड कर्जावर १० टक्के व्याजदर आहे. वाहन तारण कर्जावर ९ टक्के व्याजदर आहे. हे सर्व माहीत असून खोटेनाटे सांगून सभासदांची दिशाभूल सुरू आहे. विरोधकांच्या काळात एकदाही कर्जाचा व्याजदर कमी केलेला नाही. बँक बदनाम करण्याचा कुटील डाव सभासदच हाणून पाडतील. विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी थांबवावी व धोरणात्मक बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, शशिकांत भागवत, बाबासाहेब लाड, किसन पाटील, उपाध्यक्ष राजाराम सावंत, सुनील गुरव, शशिकांत बजबळे, श्रेणिक चौगुले उपस्थित होते.