लक्ष्मी सहकार समूहामध्ये महिलांच्या कर्तृत्वाला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:30+5:302021-01-19T04:27:30+5:30
कामेरी : लक्ष्मी सहकार समूहामध्ये महिलांच्या कर्तृत्वाला सर्वात जास्त संधी दिली जाते. महिलांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी हा समूह ...

लक्ष्मी सहकार समूहामध्ये महिलांच्या कर्तृत्वाला संधी
कामेरी : लक्ष्मी सहकार समूहामध्ये महिलांच्या कर्तृत्वाला सर्वात जास्त संधी दिली जाते. महिलांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी हा समूह नेहमी प्रयत्नशील राहून विविध उपक्रमांच्या माध्यमातून या समूहामार्फत महिलांना सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, असे प्रतिपादन जि. प. सदस्या राजश्री एटम यांनी केले.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे लक्ष्मी सहकार समूहाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू, तिळगूळ वाटप आणि भेटवस्तू वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, संतगावच्या सरपंच प्रियांका सावंत, वाळवा पंचायत समितीच्या गट समन्वयक शीतल बसरे, माजी उपसरपंच अस्मिता शेवाळे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा चौगुले, जयश्री गुरव या प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, शीतल बसरे, संतगावच्या सरपंच प्रियांका सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. समूहाच्यावतीने गावातील महिलांना तिळगूळ व भेटवस्तू वाटप करण्यात आले. लक्ष्मी महिला सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्याराणी शेवाळे यांनी स्वागत केले. जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
फोटो ओळी -१८०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे जि. प. सदस्या राजश्री एटम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी उपस्थित होत्या.