कर्मवीरांमुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:08+5:302021-05-10T04:26:08+5:30
भारतरत्न डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करताना समीर गायकवाड, प्राचार्य विलास महाडिक, बाबासाहेब कदम, एस. आर. पाटील, शशिकांत ...

कर्मवीरांमुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी
भारतरत्न डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करताना समीर गायकवाड, प्राचार्य विलास महाडिक, बाबासाहेब कदम, एस. आर. पाटील, शशिकांत निकम, मनोज फिरंगे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली, असे प्रतिपादन जायंट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण भगीरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनप्रसंगी समीर गायकवाड बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य विलास महाडिक, विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य आबासाहेब कदम, लठ्ठे डी. एड्. कॉलेजचे प्राचार्य एस. आर. पाटील, आय. टी. आय. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य शशिकांत निकम, मनोज फिरंगे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा यांच्या माध्यमातून नेत्रदान, रक्तदान, बेटी बचाओ, वृक्ष संवर्धन हा संदेश फलकाच्या माध्यमातून देण्यात आला.