सभासदहितांच्या पोटनियमामुळे विरोधकांचा पोटशूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST2021-03-15T04:25:22+5:302021-03-15T04:25:22+5:30
सांगली : शिक्षक बँकेत सभासदांच्या हितासाठी काही पोटनियमात दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठली असल्याचा आरोप अध्यक्ष ...

सभासदहितांच्या पोटनियमामुळे विरोधकांचा पोटशूळ
सांगली : शिक्षक बँकेत सभासदांच्या हितासाठी काही पोटनियमात दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठली असल्याचा आरोप अध्यक्ष सुनील गुरव यांनी केला.
पोटनियम दुरुस्तीबाबत विरोधी शिक्षक संघाने केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. गुरव म्हणाले की, विरोधकांकडे निवडणुकीत कोणता मुद्दा नसल्याने ते पोटनियम दुरुस्तीवर टीका करीत आहेत. पण हा निर्णय सभासदांच्या हिताचाच आहे. रिझर्व्ह बँकेने नफा-तोटा ताळेबंद जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे. पण लाभांशबाबत कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. तरीही सहकार आयुक्तांकडे लाशांभ देण्याबाबत विनंती केली होती. राज्यातील कोणत्याही बँकेने लाशांभ दिलेला नाही. पण कसलीही माहिती न घेता आरोप करण्याची विरोधकांची सवय आहे. डीसीपीएसधारकांवर पुतना मावशीचे प्रेम कोणाचे आहे, हे कळण्याइतके ते अज्ञानी नाहीत. ज्यांच्या काळात सर्वाधिक कर्जाचा व्याजदर होता, तेच आता व्याजदरावर बोलू लागलेत. अंकलखोप ठेवीदारांच्या आशीर्वादानेच टीका करणाऱ्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते. याचा त्यांना विसर पडल्याचा टोलाही लगाविला. यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, किसन पाटील, सचिव शशिकांत भागवत, महादेव माळी आदी उपस्थित होते.