जिल्हा परिषदेत नेत्रतज्ज्ञ भालचंद्र स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:40+5:302021-06-11T04:18:40+5:30
सांगलीत जिल्हा परिषदेत डॉ. भालचंद्र स्मृतिदिनी शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. विवेक पाटील आदींनी अभिवादन केले. ...

जिल्हा परिषदेत नेत्रतज्ज्ञ भालचंद्र स्मृतिदिन
सांगलीत जिल्हा परिषदेत डॉ. भालचंद्र स्मृतिदिनी शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. विवेक पाटील आदींनी अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डॉ. भालचंद्र स्मृतिदिन साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, डॉ. गायत्री वडगावे, नेत्र चिकित्सा अधिकारी चांदोरकर, अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील उपस्थित होते. डॉ. साळुंखे म्हणाले, डॉ. भालचंद्र यांनी रुग्णांसाठी अहोरात्र काम केले. ८० हजारहून अधिक रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया व उपचार केले. अंधांचे जीवन प्रकाशमय केले. हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. नेत्रतपासणी शिबिरांद्वारे नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते.
डॉ. संजय पाटील म्हणाले, १० ते १६ जूनदरम्यान दृष्टिदिन सप्ताह साजरा केला जातो. मधुमेहींची तपासणी, म्युकरमायकोसिसबाबत जागृती केली जात आहे. नेत्रदानाबद्दल जनजागृती, मुलांमधील अंधत्व, कोविडपश्चात उपचार आदी विषयांवर काम केले जात आहे.