विद्यार्थ्यांना आत्मविश्वासच यशापर्यंत पोहोचवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST2021-02-11T04:27:59+5:302021-02-11T04:27:59+5:30

कामेरी : ध्येयवाद व आत्मविश्वास हाच गुण ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वोच्च यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती, दारिद्र्य व व्यंगत्व ...

Only self-confidence leads students to success | विद्यार्थ्यांना आत्मविश्वासच यशापर्यंत पोहोचवतो

विद्यार्थ्यांना आत्मविश्वासच यशापर्यंत पोहोचवतो

कामेरी : ध्येयवाद व आत्मविश्वास हाच गुण ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वोच्च यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती, दारिद्र्य व व्यंगत्व हे विद्यार्थ्याच्या यशात अडचण निर्माण करू शकत नाही, असे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रवी बावडेकर यांनी व्यक्त केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे कर्मवीर शिक्षण संस्थेच्या सुनंदा जाधव कन्या ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या कुमारी धनश्री माळी, स्नेहल खराडे व प्रियांका खरात या विद्यार्थिनींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी अशोक नीळकंठ हे होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, सिनेअभिनेते व चित्रपट निर्माते विलास रकटे यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी सीमा सुरक्षा बल व बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निवड झालेल्या या विद्यार्थिनींनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत परिस्थितीवर कशी मात करता येते व यश संपादन करता येते हे सांगून मुलींना प्रेरणा दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, प्रा. संजय पाटील, प्रा. सुधीर खंडागळे, प्रा. सारिका पाटील, प्रा. भारती पाटील, मुख्याध्यापिका शैला पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीराव जेडगे, वैभव पाटील, अतुल कदम उपस्थित होते. सुधीर खंडागळे व प्रा. सुधीर खंडागळे यांनी स्वागत केले. प्रा. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा पाटील हिने आभार मानले

फोटो - १००२२०२१-आयएसएलएम-कामेरी न्यूज

कामेरी येथील कन्या ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या धनश्री माळी, स्नेहल खराडे व प्रियांका खरात या विद्यार्थिनींचा सत्कार विलास रकटे, रवी बावडेकर, भगवान पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक नीळकंठ, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.

Web Title: Only self-confidence leads students to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.