बळीराजा सुखी तरच देश समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:00+5:302021-02-09T04:29:00+5:30
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिवीर मामासाहेब पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, इतरांच्या दु:खात ज्याला ...

बळीराजा सुखी तरच देश समृद्ध
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिवीर मामासाहेब पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, इतरांच्या दु:खात ज्याला आनंद मिळतो, तो कधीच सुखी होत नाही. त्यासाठी इतरांच्या सुखातच आपले सुख पाहणे आवश्यक आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून तरुण पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा, हा उद्देश असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण माणुसकीबरोबरच खूप काही शिकलो आहोत. १९९० नंतर तरुण पिढीत चंगळवादाने थैमान घातले आहे. पण, आता वास्तवाचे भान ठेवून वागणे गरजेचे आहे.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रशांत पवार, सुप्रियाताई पवार, उद्योजिका दीपाली पवार, सुरेश खारगे, सर्जेराव पवार, दिलीपराव नलवडे, जयवंत आवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब पवार यांनी आभार मानले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले.
फाेटाे :०८ पलुस १
ओळ : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिवीर मामासाहेब पवार व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेंद्र लाड, बाळासाहेब पवार, ॲड. प्रशांत पवार आदी उपस्थित हाेते.