जागतिक योग दिनानिमित्त ऑनलाईन योग यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:32+5:302021-06-20T04:18:32+5:30

महा एनजीओतर्फे राज्यात एकाचवेळी शंभर ठिकाणी योगयज्ञ आयोजित करण्यात आला आहे. योग शिबिरासाठी श्री श्री रविशंकर आश्रमातील ...

Online Yoga Yajna on the occasion of World Yoga Day | जागतिक योग दिनानिमित्त ऑनलाईन योग यज्ञ

जागतिक योग दिनानिमित्त ऑनलाईन योग यज्ञ

महा एनजीओतर्फे राज्यात एकाचवेळी शंभर ठिकाणी योगयज्ञ आयोजित करण्यात आला आहे. योग शिबिरासाठी श्री श्री रविशंकर आश्रमातील तज्ज्ञ योग प्रशिक्षक आहेत. ऑनलाईन शिबिर प्रोजेक्टरवर दाखवून २० ते २५ व्यक्तींच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तिपर गीतांचे श्रवण केले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांचे मार्गदर्शन, मनसेचे बाळा नांदगावकर यांचे मनोगत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अंकित बत्रा यांच्या सुमधूर आवाजात देशभक्तिपर गीते सादर होणार आहेत. सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महाएनजीओचे शेखर मुंदडा, विजय वरुडकर, गणेश बाखले या योगयज्ञाचे आयोजक आहेत. डॉ. भालचंद्र साठये, केदार खाडिलकर, ओंकार शुक्ल व मनोज यादव यांनी संयोजन केले आहे.

Web Title: Online Yoga Yajna on the occasion of World Yoga Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.