शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:01+5:302021-09-05T04:31:01+5:30
पुनवत : शिराळा तालुक्यातील नाटोली केंद्रातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्तीचे ऑनलाईन मार्गदर्शन सुरू असून, केंद्रातील सर्व ...

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन मार्गदर्शन
पुनवत : शिराळा तालुक्यातील नाटोली केंद्रातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्तीचे ऑनलाईन मार्गदर्शन सुरू असून, केंद्रातील सर्व शाळांतील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
नाटोली केंद्रातील सर्व शाळांतील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत गणित विषयासाठी शिक्षिका रूपाली पाटील सागाव शाळा नंबर दोन यांनी, तर मराठी विषयासाठी निलाक्षी पाटील, सागाव शाळा नंबर एक यांनी मार्गदर्शन केले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी विष्णू दळवी, केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे, साधनव्यक्ती मधुकर डवरी यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन मिळत आहे.