सुरुलमध्ये शाळा प्रवेशाबाबत ऑनलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:08+5:302021-04-12T04:24:08+5:30
इस्लामपूर : सुरुल (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन पालक सभा घेण्यात आली. ...

सुरुलमध्ये शाळा प्रवेशाबाबत ऑनलाईन सभा
इस्लामपूर : सुरुल (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन पालक सभा घेण्यात आली. यावेळी सभापती शुभांगी पाटील यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल मुख्याध्यापिका शांता पाटील व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले. प्राथमिक शाळांच्या विकासासाठी शिक्षण विभाग सदैव कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.
लोकसहभागातून शाळेच्या झालेल्या प्रगतीबाबत सरपंच कुंदाताई पाटील, उपसरपंच जगन्नाथ पाटील यांनी समाधान व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप कुडाळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छायदेवी माळी उपस्थित होते. रामचंद्र कांबळे यांनी आभार मानले.