‘पर्यावरण समृद्धी’चे ऑनलाइन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:17+5:302021-05-19T04:26:17+5:30
वारणावती : शिराळा येथील पर्यावरण समृद्धी मंचच्या वतीने (ईपीएफ) आयोजित ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘साऊथ आशियन ...

‘पर्यावरण समृद्धी’चे ऑनलाइन व्याख्यान
वारणावती : शिराळा येथील पर्यावरण समृद्धी मंचच्या वतीने (ईपीएफ) आयोजित ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘साऊथ आशियन पीपल्स फॉर क्लायमेट क्लासेस’ या संस्थेचे समन्वयक प्रा. शिवा दुबे व प्रा. नूपुर बेंगलोर यांनी वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्यायव्यवस्था याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. नूपुर म्हणाल्या की, जागतिक तापमानवाढ आता १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत असून, नैसर्गिक आपत्तींना सुरुवात झाली आहे. यापुढे तापमान गेल्यास जगाला व विशेषतः भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रा. शिवा दुबे म्हणाले की, वातावरण बदलाचा परिणाम ऊर्जा, पाणी, माती, जंगल व जैवविविधता या संपूर्ण घटकांवर पडणार आहे.
सचिन करमाळे यांनी स्वागत केले. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक व जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, मोहन परजणे, प्रा. स्मिता जांभळी, गोदावरी क्षीरसागर, प्रमोदिनी पाटील, सुप्रिया घोरपडे, करुणा कांबळे आदींची उपस्थिती होती.