मालू हायस्कूलच्या माजी विद्यार्थांचे ऑनलाईन स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST2021-05-08T04:27:01+5:302021-05-08T04:27:01+5:30
सांगली : येथील श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या १९९७ या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वेबिनारच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत ...

मालू हायस्कूलच्या माजी विद्यार्थांचे ऑनलाईन स्नेहसंमेलन
सांगली : येथील श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या १९९७ या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वेबिनारच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत स्नेहमेळावा साजरा केला. या उपक्रमामध्ये देशविदेशांतून ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी व सहा शिक्षक सहभागी झाले हाेते.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांची विचारपुस, शिक्षकांशी संवाद या हेतूने या उपक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी शाळेतील निवृत्त शिक्षक य. म. जाेशी, जी. जी. कुलकर्णी, ब. ज. कुलकर्णी, आनंदा काेरे, सुभाष चाैगुले, के. न. जाेशी यांनी सहभागी विद्यार्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थांनी महापाैरपदी निवडीबद्दल दिग्विजय सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी य. म. जाेशी म्हणाले २४ वर्षांनंतर सर्वांना एकत्र पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून आनंद वाटला. हेच आम्हा शिक्षकांचे निवृत्तिवेतन असते. संयाेजन विशाल शेट्टी, उदय गाडवे, प्रशांत देवकर, महावीर भाेरे, सुनील कदम, संदीप आंबी यांनी केले.