महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:45+5:302020-12-05T05:04:45+5:30

सांगली : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने दिव्यांगांसाठी ऑनलाईन कविता, निबंध आणि कोरोना प्रतिबंधात्मक स्लोगन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात ...

Online competition for the disabled by the Municipal Corporation | महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑनलाईन स्पर्धा

महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑनलाईन स्पर्धा

सांगली : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने दिव्यांगांसाठी ऑनलाईन कविता, निबंध आणि कोरोना प्रतिबंधात्मक स्लोगन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांनाच सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी ५ डिसेंबरपूर्वी आपले लिखाण पाठवायचे आहे.

उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक दिव्यांग दिनाचा जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कविता, निबंध, कोरोना प्रतिबंधात्मक स्लोगन ऑनलाईन स्वरूपात पाठवायची आहेत. यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे, कोविड १९ सुरक्षा आणि उपाययोजना, टाकाऊपासून टिकाऊ निर्माण करणे, दिव्यांगांचे नवीन स्वयंरोजगार निर्मिती आणि सक्षमीकरण, सकारात्मक जीवनपद्धती असे विषय आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक दिले जाणार आहेत. स्पर्धेचा निकाल महापालिकेच्या सोशल मीडिया अकौंटवरून ७ डिसेंबरनंतर प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: Online competition for the disabled by the Municipal Corporation