एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:30+5:302021-08-26T04:28:30+5:30
सांगली : एसटी महामंडळाने तंत्रज्ञानाची कास धरत प्रवाशांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. पण, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ...

एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही
सांगली : एसटी महामंडळाने तंत्रज्ञानाची कास धरत प्रवाशांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. पण, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या अनेकांना या सुविधांची फारशी माहिती नाही. टेक्नोसॅव्ही प्रवासी ऑनलाईन बुकिंगच्या पर्यायाचा लाभ घेत आहेत.
एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंगची सुविधा आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबादसह लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जवळच्या जिल्ह्यात जाणाऱ्या बसमध्येही ऑनलाईन बुकिंगद्वारे आसन आरक्षित करू शकतो. या संकेतस्थळावर अनेकदा माहिती अपटेड नसते. तसेच निर्धारित वेळेवरही बुकिंग मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. तर, अनेकांना या सुविधांची माहितीच नाही.
चौकट
असे करावे ऑनलाईन बुकिंग- एमएसआरटीसी संकेतस्थळ उघडावे. तिथे शिवशाही, शिवनेरीसह विविध पर्याय उपलब्ध होतील.
- एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या बसचे आरक्षण किती हे समजेल.
- त्यानंतर तारीख, वेळ, आसन आरक्षित करावे. कार्डद्वारे पेमेंट करावे.
चौकट
आम्हाला ठाऊकच नाही
- एसटी महामंडळाकडून ऑनलाईन आरक्षण सुविधा देण्यात आल्याची माहिती नाही. कधी या सुविधेचा वापर केलेला नाही. यापुढे लांबच्या प्रवासासाठी त्याचा निश्चित वापर करू. - संजय जाधव
- बसस्थानकातील आरक्षण खिडकीत जाऊनच आतापर्यंत आरक्षण करीत होतो. संकेतस्थळाबाबत थोडी माहिती होती. पण, ऑनलाईन आरक्षणाची पद्धत क्लिष्ट आहे. ती अपटेडही नसते. त्यामुळे तिचा वापर कधी केला नाही. - अनुपकुमार पाटील
चौकट
प्रतिसाद चांगला
एसटी महामंडळाच्या ऑनलाईन बुुकिंगला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनापूर्वी शिवशाहीसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण चांगले होत होते. कोरोनाच्या काळात प्रतिसाद थोडा कमी होता. पण, आता अनलाॅकनंतर पुन्हा प्रवाशांचे बुकिंग सुरू झाले आहे. - अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक