कांदा प्रतिक्विंटल तीन हजारांवर

By Admin | Updated: July 27, 2015 00:35 IST2015-07-26T22:54:05+5:302015-07-27T00:35:55+5:30

पावसाअभावी दरात दुपटीने वाढ : फळभाज्या स्वस्त, पालेभाज्यांचे दर स्थिर

Onion antique three thousand | कांदा प्रतिक्विंटल तीन हजारांवर

कांदा प्रतिक्विंटल तीन हजारांवर

सांगली : पावसाने ओढ दिल्याने नव्या पिकाला फटका बसल्याचे कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. दीड हजारावरून घाऊक कांद्याचा दर तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातील विक्री २८ ते ३५ रुपये किलो झाली आहे. फळभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. सांगलीमध्ये सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याची आवक मंदावली आहे. नव्या पिकाला पावसामुळे फटका बसल्याने आवक कमी झाली आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी दीड हजार रुपये क्विंटल असणारा कांदा आता अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातही कांदा २८ ते ३५ रुपये किलो झाला आहे. यामुळे गृहिणींच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
इतर फळभाज्यांचे दर या सप्ताहात उतरले आहेत. वांगी २० ते २५ रुपये किलो असून, दोडका ३५ ते ४० किलो आहे. काकडी, गाजराचे दरही उतरले आहेत. वाटाण्याचा दर वाढून आता शंभर रुपये किलो झाला आहे. फळभाज्यांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे : टोमॅटो १८ ते २० रुपये, कोबी २५ ते ३०, फ्लॉवर ३५ ते ४०, कारली ३५ ते ४०, वांगी २० ते २५, भेंडी ३५ ते ४०, दुधी भोपळा ३० ते ४०, देशी गवारी ५५ ते ६०, गवारी ३५ ते ४०, दोडका ४० ते ४५, देशी काकडी ३५ ते ४०, तर पांढरी काकडी ३०, पडवळ ३५ ते ४०, कांदे २८ ते ३५, बटाटे १८ ते २०, लसूण ६० ते ७०, आले ९० ते शंभर रुपये याप्रमाणे दर आहेत.पालेभाज्यांचा दर स्थिर आहेत. मेथी ८ ते १० रुपये पेंडी असून, इतर भाज्यांचे दर असे आहेत. पालक ५ ते ७, तांदळ ७ ते ८, अंबाडा ५ ते ७, कांदा ८ ते १०, चाकवत ७ ते ८, शेपू ५ ते ७ रुपये. (प्रतिनिधी)
आवक मंदावल्याचा फटका
व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. परंतु संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. सातारा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमधून सांगली जिल्ह्यात होणारी आवक मंदावल्याने दर वाढले आहेत.

Web Title: Onion antique three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.