विनयभंगप्रकरणी कुंडलवाडीच्या एकास वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:42+5:302021-02-05T07:20:42+5:30
इस्लामपूूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस ...

विनयभंगप्रकरणी कुंडलवाडीच्या एकास वर्षाचा कारावास
इस्लामपूूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले न्यायाधीश एस.सी. मुनघाटे यांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोेषी ठरवून प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रोहित संजय कदम (वय २५, रा. कुंडलवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दंडाची रक्कम न दिल्यास तीन महिने साधी कैद भाेगावी लागणार आहे. पीडित मुलीतर्फे सहायक सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी काम पाहिले.
या घटनेतील पीडित मुलगी ३० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान महाविद्यालयात जाण्यासाठी इस्लामपूरला निघाली होती. त्या वेळी आरोपी कदम याने तिचा पाठलाग करत मी तुझ्यावर प्रेम करतोय, मी तुझ्यासाठी रोज इस्लामपूरपर्यंत येतोय, माझे ऐकले नाहीस तर तुला व तुझ्या घरातील सर्व लोकांना ठार मारीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी कुरळप पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले.
फोटो - २९०१२०२१-आयएसएलएम-रोहित कदम