मिरजेत एकास दगडाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST2021-03-15T04:25:44+5:302021-03-15T04:25:44+5:30

सांगली : मिरज येथे तरुणास दगडाने मारहाण करण्यात आली. नसीम हसन गोलंदाज (वय २०) असे जखमीचे नाव असून, रविवारी ...

One was stoned in Miraj | मिरजेत एकास दगडाने मारहाण

मिरजेत एकास दगडाने मारहाण

सांगली : मिरज येथे तरुणास दगडाने मारहाण करण्यात आली. नसीम हसन गोलंदाज (वय २०) असे जखमीचे नाव असून, रविवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

मिरजेत तरुणास मारहाण

सांगली : मिरजेत तरुणास मारहाण करण्यात आली. मनोज मुरलीधर माने (वय २६) असे जखमीचे नाव असून, शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

देशिंगमध्ये एकास विषबाधा

सांगली : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील एकास विषबाधा झाली. आनंदा शंकर पाटील (वय ५०) असे त्यांचे नाव असून, रविवारी दुपारी एकच्यासुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

वड्डी येथे एकास मारहाण

सांगली : वड्डी (ता. मिरज) येथे एकास तिघांकडून मारहाण झाली. प्रकाश भोसले (वय ३५) असे त्याचे नाव असून, रविवारी सकाळी आठच्यासुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

येलूरमध्ये एकास सर्पदंश

सांगली : येलूर (ता. वाळवा) येथील तरुणास सर्पदंश झाला. सागर शिवाजी जाधव (वय ३४) असे तरुणाचे नाव असून, रविवारी सकाळी नऊच्यासुमारास ही घटना घडली. नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

---

सांगलीत एकास सर्पदंश

सांगली : काळीवाट येथील धनाजी सदाशिव कांबळे (वय ३६) यास सर्पदंश झाला. रविवारी सकाळी आठच्यासुमारास गणेशनगरमध्ये हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

मिरजेचा तरुण अपघातात जखमी

सांगली : मालगाव (ता. मिरज) जवळ दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात मिरज येथील तरुण जखमी झाला. गुलाब यशवंत माने (वय ३५) असे जखमीचे नाव असून, त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

उंबरगावमध्ये एकास विषबाध

सांगली : उंबरगाव (ता. आटपाडी) येथे एकास विषबाधा झाली. सर्जेराव गुंडा पद्माकर (वय ६५) असे त्यांचे नाव असून, शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: One was stoned in Miraj